आसामच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी चक्क भाजप उमेदवाराच्या गाडीतून इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांची (EVM) वाहतूक केल्यामुळं देशभर गदारोळ सुरू आहे. शिवसेनेनं भाजपबरोबरच निवडणूक आयोगावरही कडवट शब्दांत टीका केली आहे. ‘ईव्हीएमवरील उरलासुरला विश्वास उडविण्याबरोबरच निवडणूक आयोगाच्या झोलबाजीवर या प्रकारामुळं शिक्कामोर्तब झालंय,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
आसाममधील पथारकांडी मतदारसंघात निवडणूक आयोगाची गाडी भररस्त्यात खराब झाली. त्या गाडीत मतदानयंत्रे होती. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडताच तेथे एक गाडी प्रकट झाली. त्या गाडीत निवडणूक आयोगाचे अधिकारी ‘ईव्हीएम’सह बसले व रवाना झाले. ही गाडी त्याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची होती. ही माहिती पुढं आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार व भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून या धक्कादायक प्रकारावर भाष्य केलं आहे.
Comments
Loading…