in

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

प्रतिनिधी : संजय देसाई

संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. पुढील ५ दिवस हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परस्थितीत सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. या भागात गेल्या 24 तासात 180 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर कृष्णा नदीची पाण्याची पातळी साडे सतरा वर गेली आहे. तर वारणेच्या नदी पात्र बाहेर पडले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी शिरले आहे. धरणातून पाणी सोडणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला; महाडमध्ये पुराचा पहिला बळी

प्रविण तरडेचा मनसेच्या दहीहंडीला पाठिंबा