in

पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश ; ‘लोकशाही’च्या हाती दलाल महादेव इंगळेच्या कारनाम्याचे पुरावे

राज्याच्या पोलीस प्रशासनातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालात महादेव इंगळेचं नाव समोर आले होते. या इंगळेच्या कारनाम्याचे पुरावे लोकशाही न्यूजच्या हाती लागले आहेत. यामध्ये बक्कळ रक्कम घेऊन पोलिसांच्या बदल्या करवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी 20 ऑगस्ट 2020 ला एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल 25 ऑगस्ट 2020 ला पोलीस महासंचालकांसमोर सादर केला होता. त्यांनतर 26 ऑगस्टला अहवाल गृहखात्याला पाठवण्यात आला. या अहवालात महादेव इंगळे यांचे नाव समोर आले होते. हा इंगळे पोलीस प्रशासनातील बदल्यांचे रॅकेट चालवायचा. यामध्ये एका बदलीसाठी 35 ते 40 लाखांची रक्कम स्वीकारली जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये इंगळे गृहमंत्री आणि दादांमार्फत ही बदली करून घ्यायचा. तसेच पोलीस दलच नव्हे तर इतर महत्वाच्या विभागातील बदल्यांचे काम हा इंगळे करत होता.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला, ३ जवान शहीद, 8 गंभीर जखमी

‘ज्याची वकिली केलीत तो मनसुखचा खुनी निघाला’; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका