in ,

गुटखा विक्रीच्या वादातून धावत्या एक्स्प्रेस फेरीवाल्यांमध्ये राडा

कल्याण ते टिटवाळा दरम्यान धावत्या एक्स्प्रेस मध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फेरीवाल्यांमध्ये गुटखा विकन्यावरून वाद झाला .याच वादातून त्यातील दोघांनी एका तरुनाला मारहाण केली आणि ब्लेड ने त्याच्यावर वार केले .या हल्ल्यात जखमी तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर या प्रकरणी कल्याण रेल्वे  पोलिसांनी अंकुश सरोज ,मोहम्मद शेख या फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे .पवन गुप्ता अस जखमी फेरीवाल्याच नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळत नसताना चोरटे,गर्दुल्ले ,फेरीवाले , दरोडेखोर रेल्वेत कसे प्रवेश करू शकतात तसेच स्थानकातील  सुरक्षा व्यवस्था काय करते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BiggBoss Marathi | ‘आदिश वैद्य’ आहे तरी कोण?

मुंबईमध्ये नायर रुग्णालयात लहान मुलांवर लसीकरणाची ट्रायल यशस्वी