in

अनलॉकच्या गोंधळावर फडणवीस संतापले…

राज्यातल्या अनलॉकच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, अस म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असं फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी