in

फडणवीसांना आमंत्रण नाही…नारायण राणे म्हणाले

सिंधुदुर्गामधील चिपी विमानतळाच उद्घाटन सोहळा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून. केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील सोहळ्याला उपस्थित राहणार. मात्र, उद्घाटन सोहळ्यापूर्वीच पुन्हा एकदा श्रेयाचा वाद चांगलाच चर्चेत आहे.भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोहळ्याचं आमंत्रण नाही या कारणांनी नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

मुंबईतील पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आलेल नाही. नारायण राणेंना विचारले असता, आयोजकांनी हा निर्णय का घेतला मला माहीत नाही. राज्यात कुठल्याही नव्या प्रकल्पाचं उद्घाटन होत असेल तर विरोधी पक्षनेत्याला निमंत्रण द्यायला हवं. प्रथा, परंपरांना कायद्याइतकंच महत्त्व असतं. जे काही राज्यातल्या सरकारने केले ते चुकीचे आहे. हा काही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या घरचा कार्यक्रम नाही. मुलाचं लग्न नाही. फडणवीसांना आमंत्रण द्यायला हवं होतं. ही संकुचित वृत्ती आहे,’ असे नारायण राणे म्हणाले. ‘अशा चुकांना कायद्यांना काही शिक्षा नाही. पण लोकांना यांची नियत कळली,’ असा टोला राणेंनी मारला
दरम्यान ‘फडणवीस यांच्याशी मी या विषया संदर्भात बोललो. मात्र, या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये असं म्हणाले. सिंधुदुर्गाच्या आणि राज्याच्या हिताचं काम होतंय ते महत्त्वाचं आहे, असं ते मला म्हणाले. ते सहनशील आहेत. त्यांच्या जागी मी असतो तर चित्र वेगळं असतं,’ असा इशाराही राणेंनी महाविकास आघाडीला दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरीत एकाचवेळी 21 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

डाव्या चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते कॉ.सुभाष काकुस्तेंना जीवे मारण्याची धमकी