in

फडणवीसांना अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला; अशोक चव्हाणांचा पलटवार

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. ‘आजचा निकाल निराशाजनक आहे. महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. ही लढाई अजून इथं संपली नाही. यासाठी लढा हा सुरूच राहणार आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला’, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

‘राज्याला अधिकार नाही. दुसऱ्या निकालात राज्याला अधिकार आहे ही भूमिका कशी होऊ शकते. एक मताने आम्ही मराठा आरक्षण कायदा पारित करून दिला. 102 व्या घटना दुरुस्ती नंतर कायदा करण्याचा राज्यांना अधिकार ना,ही हे स्पस्ट केले त्यानंतर फडणवीस यांनी आरक्षण दिले ते बेकायदेशीर होते, देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लढा संपलेला नाही, पुढची कारवाई करणार – अशोक चव्हाण

शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते – नारायण राणे