in

लोकप्रिय मालिका ‘जीव झाला येडापिसा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

सिद्धी आणि शिवा या जोडीची झालेली सुरूवात आणि आज त्यांचा इथवरचा प्रवास म्हणजे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक पर्वणी ठरली. जीव झाला येडापिसा या मालिकेतील ही लाडकी जोडी आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुमारे ५३५ एपिसोड्स पूर्ण झालेली ही मालिका अनेक लोप्रिय मालिकांपैकी एक नक्कीच ठरते. त्यात मालिकेतील प्रत्येक पात्राला मिळालेलं प्रेम सुद्धा काही औरच आहे.

अनेक वर्ष सुरू असलेली ही मालिका आजपासून म्हणजेज ३ एप्रिल पासून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. जीव झाला येडापिसा मालिकेची लोकप्रियता इतकी होती की मालिका एक नाही दोन नाही तर ५ विविध भाषांमध्ये तिचा रिमेक करण्यात आला. या मालिकेत पहिल्यांदाच स्क्रिनवर दिसणारे विदुला चौगुले आणि अशोक फळदेसाई यांना मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. १ एप्रिल २०१९ रोजी सुरू झालेली मालिकेने या तीन वर्षांच्या प्रवासात अनेक अडचणी सुद्धा पाहिल्या

खास करुन २०१९ला आलेला कोल्हापुरातील पुरामध्ये मालिकेचं बरंच नुकसान झालं पण त्यातून ही उभ राहत मालिकेने पुन्हा नवीन सुरूवात केली. कलर्स मराठी वाहनीवर सुरू असलेली ही मालिका दररोज रात्री ८.०० वा. भेटीला येत होती आता मात्र या मालिकेच्या जागी एक नवीन मालिका भेटीला येईल असं म्हंटलं जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पंतप्रधान असतो तर’….राहुल गांधींनी दिलं ‘हे’ उत्तर

‘आ रही है पुलिस…’ पण कधी? पुन्हा रखडणार ‘सूर्यवंशी’चं रिलीज?