in

चला हवा येऊ द्या च्या मंचावर फराह खान

झी मराठीवर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकजण ताणतणाव आहेत . पण काही क्षणासाठी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतो. मराठी कलाकारच नाही तर हिंदी कलाकारांना देखील या मंचाची ओढ आहे.

झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या ‘झी कॉमेडी फॅक्टरी’ या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पथक आणि तेजस्वी प्रकाश हे कलाकार या मंचावर सज्ज झाले. “मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं.” असं म्हणून मंचावरील सर्व विनोदवीरांचं फराह खान यांनी कौतुक केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडले; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच