in

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातच घेतला गळफास

संजय राठोड | यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 45 वर्षीय युवा शेतकरी दत्ता सिताराम राठोड असे या शेतकऱ्याचे नाव असून कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. दत्ता राठोड यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. या घटनेने गावाक एकच शोककळा पसरली आहे.

आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील 45 वर्षीय युवा शेतकरी दत्ता सिताराम राठोड यांनी आज दुपारी बारा वाजता स्वतःच्या शेतात जाऊन बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. दत्ता राठोड यांची दोन एकर शेती असून शेतीवर एक लाखाचे कर्ज होते. तसेच नापिकीमूळे त्रस्त झाले होते. त्यामुळे कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. दरम्यान दत्ता राठोड यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यात दूषित पाण्यात भाजीपाल्याची स्वच्छता

श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाने घेतली निवृत्ती