in

Farmers Protest : सिंधू बॉर्डरवर “एक हात तोडून मृतदेह बॅरिकेड्सला बांधला”

सिंधू बॉर्डरवरील हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली आहे. सिंधू बॉर्डरवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडालीय.  या व्यक्तीचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधला. या मृतदेहावर  ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार झालेले दिसत आहेत. या सर्व घटनेची माहिती मिळताच कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, “सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे तेथे (१५ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता हात बांधून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन तिथली पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेट्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला. यासोबतच ते म्हणाले की, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल,” अशी माहिती हंसराज यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गरब्याहून परतली अन् अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रोहित पवारांच्या हस्ते 74 मीटर उंच भगवा ध्वजाचे प्रतिष्ठापना