in

पीक कर्ज मिळेना; शेतकऱ्यांनी मागितली मुख्यमंत्र्यांकडे किडनी विकण्याची परवानगी

संदीप शुक्ला | बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पीक कर्ज मिळत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किडनी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भातील पत्रही मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

बुलढाण्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सूरूवात केली आहे. मात्र गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षीचेही पीक कर्ज भरता आले नव्हते. त्यात आता यावर्षीही पेरणी कशी करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे लोणवडी येथील दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील यांच्‍यासह अन्य शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार केली आहे.

तसेच या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक आणि लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्‍थेकडून गेल्या वर्षी पीककर्ज घेतले होते.मात्र अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही. त्यात आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी किडनी विक्रीची परवानगी देण्यात यावी, अशी मागनी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

५० वर्षांवरील झाडं ‘हेरिटेज वृक्ष’, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

ग्राहकांना हव्या त्या किंमतीत सिलेंडर? पुण्यात प्रयोगिक तत्वावर सुरुवात!