in

पुण्यात फिल्मी स्टाईलने केली कार चोरट्याला अटक

पुण्यात कार चोरट्याचा १० कि.मी. पाठलाग करुन फिल्मी स्टाईलमध्ये अटक केल्याची घटना घडली. गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शलने दाखवलेल्या प्रसंगावधाने चोरट्याचा मुसक्या आवळण्यात यश आले. या घटनेत आरोपी आभिषेक पवार याला अटक करण्यात आली तर एक फरार झाला.

पुण्यातील लष्कर परीसरातील साचापीर स्ट्रीट रोडवर दोघा आरोपींनी कार चालकाला चाकूचा धाक आय 20 कार पळवली होती. चोरीच्या घटनास्थळी दाखल झालेल्या दोन बीट मार्शलने जीपीएसच्या सहाय्याने दुचाकीवरुन या चोरांचा पाठलाग सुरु केला. तब्बल १० कि.मी. पाठलाग केल्यानंतर वरुन रेसकोर्सवर परिसरात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. बीट मार्शल पोलिस शिपाई संग्राम पाटील आणि वैभव हिल्लाळ यांनी हे धाडस करत आरोपींना अटक केली. या घटनेत आभिषेक पवार याला अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिंकारा हरणाची शिकार करणारे दोघे वनविभागाच्या जाळ्यात

Maratha Reservation; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे