in

Pune Fire News | पुण्यातील आगीनंतर अखेर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुण्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे लागलेल्या आगीत १८ जणांचा मृत्यू झाला होती. एसव्हीएस या केमिकल कंपनीत झालेल्या या दुर्घटनेनंतर मालकाला ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर अखेर पोलिसांनी संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं. या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता , जिल्ह्यात ‘या’ दिवशी लावणार कर्फ्यु

मुख्यमंत्रींची पंतप्रधानांसोबतची भेट वैयक्तिक, राजकीय करण्याचं कारण नाही