in

Maratha Reservation: आणखी किती पिढ्यांपर्यंत आरक्षण सुरू ठेवणार? सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिप्रश्न

आणखी किती पिढ्यांपर्यंत आरक्षण सुरू ठेवणार?असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने मराठा सुनावणी दरम्यान ५० टक्क्यांहून जास्त आरक्षणाच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कधीपर्यंत आरक्षण सुरू राहणार, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.

वकील मुकुल रोहतगी यांनी सुनावणी दरम्यान मंडल आयोगासंदर्भातील काही तरतुदींचा पुनर्विचार करण्यावर टिप्पणी केली. बदलेल्या परिस्थितीचा विचार करता कोर्टाने आरक्षण कोटा निश्चित करण्यासाठी राज्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मंडल आयोगाचा निकाल १९३१ च्या जनगणनेनुसार ठरविण्यात आला. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा ठरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज महाराष्ट्र सरकारची बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी बोलून दाखवली.

रोहतगी यांनी मराठा आरक्षणाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या बाजूने युक्तीवाद केला. मंडल प्रकरणी निर्णय देताना विविध पैलू समोर मांडले गेले होते. या निर्णयाला इंदिरा सहानी प्रकरण म्हणूनही ओळखले जाते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हाफकिनमध्ये होणार कोरोना प्रतिबंधक लस? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

चले तो चाँद तक… : चीनची लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह