in

कोरोनामुळे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं निधन

कोरोनानं राज्यात धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्येसह मृत्यूदरातही वाढ होत आहे. डहाणूचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं सोमवारी (१२ एप्रिल) रोजी पहाटे निधन झालं. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

पास्कल धनारे हे २०१४ साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व असताना मोदी लाटेत प्रथमच भाजपला इथं विजय मिळवता आला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bappi Lahiri | कोरोनावर यशस्वी मात, बप्पी लहरींना मिळाला डिस्चार्ज!

शरद पवारांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर