in

CBIचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन

केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.रणजीत सिंह 1974 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे संचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) चे महासंचालक पदावर कार्यरत होते.

भ्रष्टाचाराचे आरोपही रणजीत सिन्हा यांच्यावर झाले होते. त्यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. सीबीआयचे प्रमुख असताना कोळसा घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. रणजीत सिन्हा यांनी आपल्या कारकीर्दीत सीबीआय संचालक, आयटीबीपी महासंचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0
संग्रहित छायाचित्र

भारतात कोविडमुळे दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले

राज्य सरकारला आलेल्या 2 लाख लसी पैकी बीडला पुरेसे लस नाही; पंकजा मुंडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र