in

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार फ्री-शीप

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये (एमएनएलयू) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना फ्री-शीप आणि स्कॉलरशीप देण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. एमएनएलयूमध्ये फ्री-शीप आणि स्कॉलरशीप मिळावी, यासाठी अनिकेत राजेंद्र सावंत याच्यासह तीन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकार व इतरांविरूद्ध याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेत न्या. एन.एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुळकर्णी यांनी हा निर्णय दिला आहे. यामुळे मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे एमएनएलयूमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रत्येक युनिव्हर्सिटीत प्रत्येक वर्षाला किमान १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रती विद्यार्थी दीड ते दोन लाख रुपये शुल्क घेतले जाते. याशिवाय शिष्यवृत्तीही दिली जात नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या हक्कापासून डावलले जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नवीन सत्रापासून होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच प्रमाणे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शुल्कामध्ये काही सूट दिली जाणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीस दिल्लीत आल्यानंतर ‘हे’ पत्र समोर आलं – शरद पवार

प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपालांची भेट