in

Free vaccination Maharashtra: महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार- राजेश टोपे

महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना ही मोफत लस देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच 5 कोटी 71 लाख नागरिकांना मोफत लसीकरण करणार असल्याचे त्यांनी म्हटले. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.

महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु करताना मुबलक लसी, कर्मचारी वर्ग यांची सोय सरकारला करावी लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

LockDown in Goa | गोव्यात उद्या सायंकाळपासून लॉकडाऊन

Maharashtra Lockdown | राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन; राजेश टोपेंनी दिले संकेत