in

यशराज फिल्म्सच्या वतीनं 30,000 लोकांचं मोफत लसीकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोणाला उपचारांसाठी बेड मिळत नाही आहे तर काही लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर यशराज फिल्मसच्या यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं मजूर, तंत्रज्ञ आणि लहान कलाकारांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.

यशराज फिल्म्सनं इंडस्ट्रीतील एकूण 30,000 लोकाचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर यशराज फिल्मच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमासाठी लागणारे लसींचे डोस उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपा नेत्यांचा ‘अ‍ॅरोगन्स’ हे बंगलाच्या पराभवाचे कारण,सामनातून टोला

दिलासा : लशींचे आज ९ लाख डोस येणार