in

Bureau of Indian Standards | १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री होणार नाही

मागील अनेक महिन्यापासून सोन्याच्या भावामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. सोन्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं आता हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल आणि दर्जेदार सोनं खरेदीची हमी ग्राहकांना मिळणार आहे. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बीआयएसनं सर्व नोंदणीकृत ज्वेलर्ससाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. यात २२ कॅरेट, दुसरं १८ कॅरेट आणि तिसरं 2४ कॅरेट असे टप्पे असणार आहेत. केवल तीन प्रकारातील गुणवत्तेतील सोन्याच्या विक्रीमुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये व्यवहाराची स्पष्टता राहील, असं म्हटलं जात आहे. सोन्याच्या दागिन्यांवर असणारा हॉलमार्क संबंधित दागिन्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता दर्शवतो. सध्या सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क असं अनिवार्य होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन यांची हत्या? एटीएसकडे सचिन वाझेंविरोधात पुरावे

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त, हायकोर्टाचे शिक्कामोर्तब