in

“गदर २” येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

काही बहारदार सिनेमे अजरामर असतात, त्यापैकीच एक असलेला ‘गदर’ एक प्रेम कथा, या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर तुफान कमाल केली होती, आता या चित्रपटाचा पार्ट २ येणार असल्याची माहीती मिळतेय .

‘गदर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण गदर २ ची कथा थोडी वेगळीच असणार आहे. या चित्रपटात तारा सिंग पुन्हा पाकिस्तानला जाणार आहे, पण साकीना साठी नसून तो त्याच्या मुलासाठी जाणार आहे, तारा सिंग ची भुमिका प्रसिद्ध अभिनेता सनी देओल याने केली होती, तर सकिना या पाञाची भुमिका अभिनेञी अमिषा पटेल हिने केली होती.

गेल्याच महिन्यात ‘गदर’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते.अनिल शर्मा लवकरच ‘गदर २’ चित्रपटाची घोषणा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.अनिल शर्मा चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Air India कर्मचाऱ्यांना धक्का!

Chiplun Flood | आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी – देवेंद्र फडणवीस