in

दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन आरोपींनी व्हिडीओ केला व्हायरल

दहा वर्षीय मुलीवर शाळेतच अल्पवयीन मुलांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.विशेष म्हणजे या घटनेत नऊपैकी पाच आरोपी नातेवाईक असून त्यांनी बलात्काराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला होता. या व्हिडीओनंतर या प्रकरणात आरोपींना अटक करण्यास वेग आला आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

हरियाणाच्या रेवारी जिल्ह्यातील २४ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. शाळेच्या इमारतीत दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपीसह आठ अल्वपयीन मुलांचा समावेश आहे. इतकंच नाही तर हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करुन व्हिडीओ ऑनलाइन शेअर करण्यात आला.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचवीत शिकणारी पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना तिचं अपहरण करण्यात आलं होतं. कुटुंबाने व्हिडीओ पाहिल्यानंतर ९ जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपींनी मुलीला शाळेतील रिकाम्या इमारतीत नेलं आणि बलात्कार केला. १८ वर्षीय मुलाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि इतर दोन अल्पवयीन आरोपींनी तो फॉरवर्ड करुन व्हायरल केला”. आरोपींमधील पाच जण १० ते १२ वयोगटातील असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची रुग्णालयातून सुखरूप वापसी

डोक्याला विंचू चावल्यानं 14 वर्षीय मुलीचा मृत्यू