in

नांदेडमध्ये गँगवॉर; आधी गोळीबार, मग तलवारीने वार करून गुंडाची हत्या

गँगवार मधून नांदेड मध्ये एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या अन्य गटातील गुंडानी विक्की ठाकूर नाव असलेल्या गुंडाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. नांदेड शहरातील गाडीपुरा भागात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

मयत विक्की ठाकूर नुकताच तुरुंगातुन जामीनावर सुटला होता. रात्री तो आपल्या घराजवळ थांबला असता दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी नेम चुकवून विक्की ठाकूर धावत सुटला . आरोपीनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. नंतर त्याच्या शरीरावर तलवारीने अनेक वार करण्यात आले. यात विक्की ठाकूर हा जागीच ठार झाला. पुन्हा हवेत गोळीबार करून आरोपी पसार झाले . विक्की ठाकूर हा कुख्यात गुंड  विक्की चव्हाण याचा  साथीदार होता. वर्षभरापूर्वी कैलास बिगानिया नामक गुंडाने विक्की चव्हाण याचा खुन केला होता. बिगानिया गॅंगनेच आता चव्हाण याचा साथीदार विक्की ठाकूर याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘बर्ड फ्लू’मुळे दिल्लीत बालकाचा मृत्यू

कोरोनाचे नियम पाळत घरीच नमाज अदा करीत बकरी ईद साजरी