in

कोरोनामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यलयाचे गेट बंद

फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत अमरावतीमध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत होता. त्या कालावधी मध्ये नियम देखील कडक करण्यात आले होते. शासकीय कार्यालय देखील कमी उपस्थितीमध्ये सुरू होती. दरम्यान नागरिकांची गर्दी देखील ओसरली होती. मात्र सद्या जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली. मात्र तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे.

रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आता नागरिक घराबाहेर पडताहेत.. अश्यातच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला असल्याने नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश घेण्यास अडचणी तयार होत आहे.तर आत मध्ये जाण्यासाठी एक छोटीसी जागा आहे त्या भुसकीतुन नागरिकांना ये जा करावं लागतं आहे,जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कार्यलयाचे मुख्य प्रवेश द्वार सुरू करावे अशी मागणी आता सर्व स्थरातून केली जाते आहे..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राऊत आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर; संघटना वाढीसाठी प्रयत्न

Gold Silver | सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले; जाणून घ्या आजचे दर