in

Gauri Pujan 2021 | घरोघरी आज गौरींच्या आगमनसोबतच फराळांची दरवळ

गणेशोत्सवाच्या (GANESH CHATURTHI) काळात गौरींचही आगमन होतं. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींच घरोघरी आगमन होतं. गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. असं म्हणतात की गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. तिच्यासाठीच्या फराळात कोठेही कमी राहू नये, यासाठी घरोघरच्या सुगरणी कामाला लागल्या असून, फराळाच्या पदार्थांचा दरवळ सुटू लागला आहे, तसेच महिलांचा त्रास वाचविण्यासाठी हलवाईही सरसावले असून, शहरात विविध ठिकाणी करंजापासून चकलीपर्यंत आणि बदामी हलव्यापासून म्हैसूरपाकापर्यंतच्या सर्व पदार्थांचे स्टॉल लागले आहेत.

गौरींचे आज रविवार (ता. १२) आगमन झाले, तर सोमवारी गौरीपूजन आहे. या दिवशी गौरीपुढे विविध प्रकारचे पदार्थ मांडले जातात. गौरीच्या इतर सजावटीला गोड, तिखट पदार्थांची सुंदर चव देण्याचाही विशेष प्रयत्न केला जातो. हा गौरीसाठीचा फराळ किमान चांगला व्हावा, फराळाच्या मांडणीत भरपूर पदार्थ असावेत यासाठी महिला वर्ग काळजी घेतो. त्यामुळेच घरोघरी पदार्थ तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. अनेक महिलांना सर्व पदार्थ करणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन साताऱ्यातील हलवायांनी मिठाईसह विविध पदार्थांनी आपली दुकाने गच्च भरून ठेवली आहे. मिठाई खरेदीसाठी आजपासूनच महिलांची वर्दळ वाढली आहे.

दरम्यान, विविध प्रकारच्या डाळी, तेल, साखर यांचे दर काही प्रमाणात वाढल्याने पदार्थांच्या दरातही साधारण पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे. फराळाच्या पदार्थापैकी करंजा, चकल्या, काही प्रकारचे लाडू महिला घरी करतात. मात्र, मिठाई शक्‍यतो घरी कोणीच करत नाही. साताऱ्यात लहान-मोठे मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. शहरात राजपथ, कर्मवीर भाऊराव पाटील पथावर अनेक हलवायांनी आपली दुकाने थाटली आहेत. विविध प्रकारचे लाडू, माहीमचा हलवा, सुतारफणी, बालुशाही, म्हैसूरपाक, फरसाण असे पदार्थ महिला खरेदी करताना आढळतात.

ज्येष्ठागौरी आवाहन : रविवार, १२ सप्टेंबर २०२१

भाद्रपद सप्तमी प्रारंभ : रविवार, १२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटे.

भाद्रपद सप्तमी समाप्ती : सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटे.

ज्येष्ठागौरी आवाहन शुभ मुहूर्त : रविवार, १२ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी सकाळी ०९ वाजून ४९ मिनिटे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तेलंगणामध्ये आता ड्रोन करणार औषधं आणि लसीचा पुरवठा

Mumbai