in

गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का? दिल्ली हायकोर्टाचा सवाल

कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये, तर सर्वोच्च न्यायालयाही कोरोनाशी निगडीत याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी भाजप खासदार गौतम गंभीर यांचा उल्लेख करत न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचे वाटप केले आहे. याची दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेत आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजप खासदार गौतम गंभीर कोरोना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे खरेदी करण्यासाठी सक्षम आहेत का, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी केला. न्या. न्यायाधीश विपीन सांघी आणि न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती.

औषधे विकण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. लायसन्स नसताना कोणत्याही व्यक्तिला औषधांचं वाटप करण्याची परवानगी कशी मिळू शकते? औषधे वाटण्यासाठी खासदार गौतम गंभीर यांनी लायसन्स घेतले होते का? कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे वाटप करत होते? असे थेट प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने उपस्थित केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही!

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे ‘या’ ट्रेन रद्द