गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केलीय. त्यावरूनच आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘गृहमंत्री अनिल देशमुखांना क्लीनचिट देणे शरद पवारांच्या अंगलट आले आहे. एकीकडे नागपूर मधील हॉस्पिटलने त्यांचा खोटारडे पणा उघड केला असताना आणखी एक पुरावा समोर आला आहे. या वयात किती खोटं बोलावं माणसाने’ अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
Comments
Loading…