in

भाजपला धक्का, गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDAमधून बाहेर

भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएला गोव्यातून मोठा धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वात गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीमध्ये एनडीएबाहेर पडण्याचा ठराव एकमताने संमत झाला.

25 जानेवारी 2016 रोजी सरदेसाईंनी गोवा फॉरवर्ड पार्टीची स्थापना केली होती. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत जीएफपीने चार उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे यापैकी तीन जागांवर पक्षाला विजय मिळाला. तर मार्च 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत परत येण्यामध्ये गोवा फॉरवर्ड पार्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भाजपविरोधी भूमिकेतून पक्षाची स्थापना झाली होती.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा गाठण्यात कुठल्याही पक्षाला यश आलं नाही. अखेर 17 जागांसह मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत होती. त्याआधीच 13 जागांसह भाजपने गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी (मगो) आणि अपक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली.

याआधी, मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाचा विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने सप्टेंबर महिन्यात थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली. अखेर महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सेनेने आपण एनडीमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपालाही पंढरपुरात पावसाच्या चमत्काराची आस; देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पाऊस आणि वादळ

अखेर वर्ध्यात 18 हजार 360 लसीचे डोस पोहचले…