in

Gold Price Today | सोनं आणखी स्वस्त, वाचा आजचे दर?

आज सोन्याच्या किमतींमध्ये सलग चौथ्या घसरणीची नोंद झाली आहे, तर चांदीही आज स्वस्त झाली आहे. आजच्या एमसीएक्सवरील सोन्याचे वायदे 0.4% ने कमी होऊन ते 44,538 प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. याखेरीज चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 63,985 प्रती किलो झाली आहे.

तज्ञांचे मत आहे की, सोन्याचे दर कमकुवत होणे जास्त काळ टिकू शकत नाही. डॉलरची कमकुवतपणा, वाढती महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे.

पुढील दोन महिन्यांत महाग होऊ शकते सोने

सोन्याच्या किंमती लवकरच वाढू शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांत सोन्याची किंमत 48,000 रुपयांपर्यंत जाईल. त्याचबरोबर दोन महिन्यांत चांदी 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असेल. त्याचवेळी, सोन्याची वाढ खूप वेगवान होईल आणि ती 45,500 रुपयांची पातळी ओलांडेल आणि 48,000 रुपयांपर्यंत पोहोचेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेनप्रकरणी आणखी एकाला अहमदाबादवरून अटक

राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होतेय’; बाळासाहेब थोरात यांचा संजय राऊतांना टोला