in

Gold Price | सोन्याचे भाव घसरले

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये बरीच चढ उतार पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या चांदीच्या भावात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे . सोन्याचे भाव कमी झाल्याने लग्न सराईच्या दिवसांमध्ये सोने खरेदी करायची ही चांगली संधी आहे. आज भारतीय बाजारात सोने 45,000 च्या खाली खाली गेले आहे. एमसीएक्स वर सोन्याचे वायदा 0.1 टक्क्यांनी घसरून 44981 प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा वायदा 1.4 टक्क्यांनी घसरून 66,562 प्रती किलो झाला आहे.

24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलताना, आज देशाच्या राजधानीत 10 ग्रॅमची किंमत 48,380 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईतील 46,340 रुपये, मुंबईत 44,910 रुपये आणि कोलकातामध्ये 47,210 रुपये पातळीवर आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या घसरणीसह ट्रेड होत आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति औंस 5.07 डॉलरने घसरून 1,740.26 डॉलरवर बंद झाला. त्याचबरोबर चांदी 0.50 च्या घसरणीसह 25.74 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Jammu & Kashmir | शोपियानमधील चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी मुंबईत सेबीच्या अधिकाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी