in

Gold Price| स्वस्त झालं सोनं

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत आहे. त्याचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसतोय. सोन्याबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत.

या आठवड्यात नफा वसुलीने सोने आणि चांदीला मोठा फटका बसला आहे. जागतिक बाजारात चालू असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम कमोडिटी मार्केटवर पडताना दिसतोय. त्यामुळे या आठवड्यात सोन्याचा भाव पुन्हा 47 हजाराच्या खाली घसरला आहे.काल पुन्हा सोन्याच्या भावात 106 रूपयांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतितोळा 47783 वर स्थिरावला आहे. त्याआधी कमोडिटी मार्केट खाली गेले असताना सोन्याचा भाव 47,771 पर्यंत खाली आला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी होत राहिल्या तर येत्या काळात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील मोठी घसरण होताना दिसतेय. मंगळवारी चांदीच्या दरात 82 रूपयांची घट झाली. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 68281 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करा; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

चिपळूणमध्ये आभाळ फाटले