in

Gold Price | सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण

आज सलग 5 व्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. तर चांदीच्या किमतीतही घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने वर्षाचा निच्चांकी स्तर गाठला आहे. आज एमसीएक्सवरील जून सोने वायद्यात 0.3 टक्क्यांची घसरण झाली असून 44,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बाजार बंद झाला आहे. गेल्या सात दिवसांत पाच वेळा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमती 0.8 टक्क्यांनी खाली येवून 62,617 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 44,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहेत. हा दर गेल्या वर्षभरातला सर्वात नीचांकी दर आहे. बुधवारी चांदीच्या भावातही घट दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर 0.8 टक्क्यांनी घसरून 62,617 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 24.01 डॉलर प्रति औंसवर कायम आहे. खरंतर गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. काल सोन्याचा दर 44,538 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर चांदीचा दर 63,985 रुपये प्रतिकिलो होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘केवळ RSSचे लोक देशभक्त आणि बाकी सर्व देशद्रोही बनलेत’

मुंबई क्राईम इंटेलिजन्स यूनिटची सूत्रं मिलिंद काथे यांच्या हाती