मागील काही आठवड्यांपासून सोन्याच्या भावामध्ये चढ उतारा होत आहे. अमेरिकेच्या बॉन्ड यील्डच्या तेजीत या आठवड्यात सोनं 45 हजारांवर बंद झालं आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं शेवटच्या व्यवसायिक सत्रात 11.40 रुपयांच्या तेजीसोबत (+0.66%) 1743.90 डॉलर प्रति आउन्सच्या स्तरावर बंद झालं. MCX वर एप्रिल डिलिव्हरी असलेलं सोनं 57 रुपयांच्या तेजीसोबत 45,008 रुपये प्रति दहा ग्रामवर बंद झालं. त्याचप्रकारे जून डिलिव्हरीचं सोनं 9 रुपयांच्या घसरणसोबत 45,300 रुपयांवर बंद झालं.
इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं शेवटच्या व्यवसायिक सत्रात 11.40 रुपयांच्या तेजीसोबत 1743.90 डॉलर प्रति आउन्सच्या स्तरावर बंद झालं आहे . या आठवड्यात चांदी देखील 67,500 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली.आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतीवर दबाव दिसतो आहे. 26.33 डॉलर प्रति आउन्सवर बंद झाली.
Comments
Loading…