in

Gold Price Today | सोन्या-चांदीचा भाव घसरला

देशात सोन्याच्या दरात सोमवारी मोठी घसरण दिसून आली. भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर गेल्या एक आठवड्यापासून वधारलेलाच दिसत होता. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच व्यवसायिक दिवसाची सुरुवात सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीने झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेन्जनुसार, सोने 48,076 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आहे. तर चांदी 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह म्हणजेच 274 रुपयांच्या घसरणीसह 68045 रुपये प्रती किलो ग्रॅमवर आहे.

यापूर्वीच्या सत्रात सोन्याच्या दरात 400 रुपये प्रती 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली होती. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,190 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 24-कॅरेट सोन्याचा दर 48,190 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. तर राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 51,700 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बेळगावमध्ये बकरी ईद सणासाठी नियमावली जाहीर

‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा ‘फर्स्ट लुक रिलीज