in

Gold Price Today | चार दिवसांनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, तर चांदीच्या दरात घट

आज मुंबई आणि पुण्यासारख्या शहराक 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48 हजार 300 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47 हजार 300 रुपये इतका झाला आहे. चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी ही घट झाली असून आज त्यामध्ये 300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज एक किलो चांदीचे दर 67 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे.

मागील सत्र संपेपर्यंत सोन्याच्या वायद्याची किंमत खाली घसरली आहे. स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये मंगळवारी सोन्याचे भाव 46 रुपयांनी घसरून 48 हजार 048 रुपयांवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठीचे सोन्याचे भाव 46 रुपयांनी म्हणजेच 0.1 टक्क्यांनी घसरून 48 हजार 048 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत GoldPrice.org नुसार आज सकाळी सोनं एमसीएक्सवर 0.21 टक्क्यांनी घसरत आहेत आणि धातू प्रति औंस 1807.65 च्या पातळीवर आहे. तर चांदी 1.15 टक्क्यांनी घसरली असून चांदी 24.88 औंस डॉलर प्रति औंसच्या पातळीवर आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये “टायटन’ सर्वोत्तम

डॉ.निशिगंधा वाड साकारणार जिजाऊंची भूमिका