in

Gold Rate | जाणून घ्या गुढी पाडव्यापूर्वी काय आहे सोने-चांदीचा भाव

आज सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव दिसून आला. तर गुढी पाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याची मागणी सराफा व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४६५०८ रुपये असून त्यात ८५ रुपयांची किंचित घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६६७९४ रुपये असून त्यात १८९ रुपयांची घसरण झाली आहे. याआधीच्या सत्रात शुक्रवारी चांदीमध्ये देखील मोठी घसरण दिसून आली. एक किलो चांदीचा भाव ६७ हजारांखाली स्थिरावला. बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६६९६१ रुपये झाला त्यात ५४० रुपयांची घट झाली. तत्पूर्वी चांदीचा भाव ६६३७१ रुपयांपर्यंत खाली घसरला होता.

जागतिक बाजारात मात्र सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव १७४०.५७ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २५.१९ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.२ टक्के घसरण झाली आहे. कमॉडिटी विश्लेषकांच्या मते अमेरिका आणि चिनी अर्थव्यवस्था सावरत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातून गुंतवणूक काढून घेत आहेत.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४७२० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५७२० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५६७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९८२० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३७८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७७६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५८७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५७० रुपये आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लसीकरण मोहीम उत्सव की युद्ध, हे एकदा ठरवा’

वर्ध्यात संपर्क कक्ष स्थापना करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना