in

जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

मागील काही आठवड्यापासून सोन्याचे दर बऱ्याच कमी पातळीवर दिल्ली सराफात सोन्याचा दर 83 रुपयांनी वाढून 45,049 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दिल्ली दराफात मंगळवारी चांदीचा दर 62 रुपयांनी वाढून 64,650 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.

जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,733 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 24.97 डॉलर प्रती औंस झाला. एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर डॉलर काही प्रमाणात कमकुवत झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या ज्यांना परवडते ते सोने खरेदी खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. कारण सोन्याचे दर बऱ्याच खालच्या पातळीवर असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी भारतामध्ये सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते.
आता ते 45 हजार रुपयांवर आले आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वळसे पाटलांनी स्वीकारला पदभार…तर, जयंत पाटलांनी दिल्या हटके शुभेच्छा!

Bhiwandi Fire | भिवंडीत अग्नितांडव