in

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण – पाहा आजचे भाव

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी 10 ग्रॅम सोन्याचे भाव 122 रुपयांनी घसरले. सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली. जागतिक मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर 587 रुपयांनी वधारले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

सोमवारी दिल्लीतील बुलियन मार्केटमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 44,236 रुपयांवरून 44,114 रुपयांवर घसरले. अशा प्रकारे सोन्याचे भाव 122 रुपयांनी कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 10 ग्रॅम 1,699 वर होते.जागतिक मागणीत वाढ झाल्याने दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचे दर 587 रुपयांनी वाढून 65,534 रुपयांवर गेले. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव प्रतिकिलो 64,947 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी प्रति औंस 25.31 डॉलर होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एनआयएकडे तपास देण्याचा डावात काहीतरी काळंबेरं-उद्धव ठाकरे

JEE Main परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार, येथे पाहा निकाल