in

पुणेकरांसाठी खूशखबर | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘म्हाडा’कडून 2 हजार घरांची सोडत

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) माध्यमातून सर्वसामान्यांची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे २ हजार ९०८ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला असून या माध्यमातून ‘सन २०२२ – सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य शासनाने आश्वासक पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी म्हाडाने पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले. सोडतीतील विजेत्या यशस्वी अर्जदारांना सदनिकांचा ताबा लवकरात लवकर देण्यात यावा, त्यासाठी काही अडचण असल्यास त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. पवार यांनी दिले. 

लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ‘म्हाडा’च्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे सदनिकांसाठी सोडत प्रक्रियेला आजपासून प्रारंभ होत असून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून या कामासाठी कोणाही मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणाच्याही फसवणुकीला बळी न पडता पुणे मंडळाने घोषित केलेल्या सोडतीत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सदनिका सोडतीबाबत माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिनांक २९ मे, २०२१ रोजी प्राप्त अर्जाची सोडत कार्यक्रम पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. १४ मे, २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी

➡️ दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व नोंदणीकृत अर्जदार ऑनलाईन अर्ज करु शकतील.

➡️ ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक १३ मे, २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे.

➡️ दिनांक १४ मे, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 

➡️दिनांक १५ मे, २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे.

➡️ दिनांक १६ मे, २०२१ रोजी संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लॉकडाऊनच्या भीतीनं LTT स्थानकावर परप्रांतीयांची मोठी गर्दी

‘परमबीर यांना मुख्य आरोपी करणं केंद्राला मान्य नसावं’