in

मालाड दुर्घटनाः राज्य सरकारची मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात बुधवारी मध्यरात्री रहिवासी इमारत कोसळल्याची दुदैवी घटन घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेवर आता ठाकरे सरकारने मदत जाहीर केली आहे.

मालवणी इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नालासोपाऱ्यात पावसाने उडवली दाणादाण

लसीकरण पूर्ण करणा-या ग्रामपंचायतींना मिळणार ५ लाखांचा निधी