in

‘थोर विभुती आणि समाजसुधारकांचं स्मरण करणं औचित्यपूर्ण’

महाराष्ट्र राज्य आज 61वा वर्धापनदिन साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जनतेला उद्देशून संदेश पाठविला आहे. तसेच, एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत महाराष्ट्र दिनाच्या या मंगलप्रंसगी राज्यातील जनतेला राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तदेखील मी सर्व श्रमिक बंधू भगिनींना शुभेच्छा देतो, असंही राज्यपाल म्हणाले.

राज्यनिर्मितीच्या आजच्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर विभूतींचे आणि समाजसुधारक नेत्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल, असंही कोश्यारी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करताहेत’

‘महाराष्ट्रानं अनेक अस्मानी-सुलतानी संकटाला तोंड दिलं, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत’