in

Nashik Lockdown : पालकमंत्री छगन भुजबळांचे संचारबंदीचे संकेत!

नाशिकमधील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असतानाच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. किमान तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा लागणार असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यामुळे पुण्यानंतर नाशिकमध्ये देखील मिनी लॉकडाऊन अथवा संपूर्ण संचारबंदीच्या निर्णयाचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

येवला-लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांनी अचानक कोविड सेंटरची पाहाणी केली. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांशी विविध मुद्दयांवर चर्चा केली. विंचूर येथे उभारण्यात आलेल्या खासगी कोविड केअर सेंटरची भुजबळांनी पाहाणी केली. त्यासोबतच त्यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयातही भेट दिली. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सद्या 30 बेडस कार्यान्वित असून अधिक 10 ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच होम क्वारन्टाईन रुग्ण घराबाहेर पडत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच होम क्वारन्टाईन रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसात तक्रार करा, असे आदेश दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Nitin Raut : “वाढत्या रुग्णसंख्येमुळे आव्हानात्मक परिस्थिती, नागरिकांचे सहकार्य आवश्यक”

“पश्चिम बंगाल निवडणूक हारल्यानंतर ममता दीदी मतदारसंघाच्या शोधात असतील”