in

वर्ध्यात संपर्क कक्ष स्थापना करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

प्रतिनिधी भूपेश बारंगे

राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. अनेक जिल्ह्यात परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशा परिस्थितीमध्ये वर्ध्यातही बेड उपलब्ध नसल्याचे अनेकांच्या तक्रारी होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतली आहे.रुग्णाच्या नातेवाईकांना बेडची माहिती होण्यासाठी संपर्क कक्ष स्थापना करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी उपजिल्हा रुग्णालय तसेच सेवाग्राम, सावंगी रुग्णालयात एकूण १ हजार १४० बेड उपलब्ध आहे . सध्या ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहे, ४९५ बेड अजूनही शिल्लक आहेत. जिल्ह्यात १हजार २० ऑक्सिजन बेड आहेत. तर ६८ व्हेंटिलेटरवर कार्यरत आहे. ही सर्व माहिती सर्वसामान्य पर्यंत पोहचत नसल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ संपर्क कक्ष सुरू करावे तसेच सेवाग्राम येथे लिक्विड ऑक्सिजन नवीन टॅंक सुरू करण्याचे निर्देश वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे.

जिल्ह्यात कोव्हीशिल्ड लस संपलेली असून अनेक केंद्र बंद करण्यात आले आहे. कोव्हक्सीन लस उपलब्ध आहे. कोव्हक्सीन लसचा सुद्धा केवळ दुसरा डोज सुरू राहणार आहे. केंद्र शासनाकडून लस प्राप्त होताच नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना अनेक कोरोना रुग्ण गृहविलगीकरण केले आहे मात्र ते घराबाहेर पडत असून फिरत आहे. यावर निगराणी ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात यावे असे निर्देश सुनील केदार यांनी दिले .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Rate | जाणून घ्या गुढी पाडव्यापूर्वी काय आहे सोने-चांदीचा भाव

कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा