in , ,

पुणे शहरात परतीच्या पावसाचा हाहाकार !

पुणे शहरात शनिवार ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. शनिवारी पुण्याला झोडपणाऱ्या पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतली आहे .जोरदार पावसामुळं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. काही तासांच्या पावसामुळे पुण्यातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झाल्याच दिसुन येत आहे.

पुण्याच्या धानोरी, लोहगाव, कळस या भागात जोरदार पाऊस झाला असून या भागातील डोंगरावरून येणारं पाणी सखल भागात साठतं ज्यामुळे रस्त्यांवर पाण्याचा मोठा प्रवाह वाहायला लागला. अनेक सोसायटी आणि घरांमधेही पाणी शिरलं.

पुणे शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या.या पावसामुळे दोन वर्षांपूर्वी झालेल्या पावसाची पुणेकरांना आठवण झाली.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिर्डी विमानसेवा आज पासून सुरू

अकोल्यात वाहतूकीसाठी नवी नियमावली