in

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन

बीड – विकास माने | बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं आहे.

मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाचे अधिकारी पंचनाम्याचे नाटक करत असून पंचनाम्याचे नाटक थांबून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.एफआरपीचे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एकरकमी 14 दिवसाच्या आत देण्यात यावी, त्याबरोबरच 2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.

नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचा पुनर्वसन करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ : करवीरनिवासिनी महालक्ष्मी

आणि अजितदादांनी आंदोलनाला लावलेल्या हजेरीने कार्यकर्त्यांची मने जिंकली…