in

‘परमबीर यांना मुख्य आरोपी करणं केंद्राला मान्य नसावं’

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या शुक्ला यांच्या बदलीचं कारण काय? अशी विचारणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं का ठेवली, कोणी ठेवली हा तपास करण्याची गरज होती. परमबीर सिंग यांनी पत्र लिहिलं त्याचवेळी ते या कटात सहभागी असल्याचं मी म्हटलं होतं. असंही मुश्रीफ म्हणाले. अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं असावं आणि हे केंद्र सरकारला मान्य नसावं, अशी शंका मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणेकरांसाठी खूशखबर | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘म्हाडा’कडून 2 हजार घरांची सोडत

coronavirus | ”राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनली आहे”