in

खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; मुश्रीफांचा गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा सांगितली. यावेळी लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार तसंच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावरच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी आपल्या तब्येतीची चौकशी केल्याबद्दल किरीट सोमय्या यांचे आभारही मानले. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले, किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षड्यंत्र आहे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत, असा गंभीर आरोपही मुश्रीफ यांनी केला.

‘मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांचा वापर त्यांनी फक्त टूल म्हणून केलेला आहे. चंद्रकांत पाटलांना सातत्याने चिंता वाटते की, आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजपा भुईसपाट झालेला आहे. हा कोणी भुईसपाट केला? तर हसन मुश्रीफ याला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीत येण्याची सुद्धा विनंती केली होती. मात्र, पवार एके पवार म्हणत मी ती विनंती मान्य केली नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ठाकरेंनी भगवा सोडून हिरवा रंग धारण केलाय’

‘ईडीला तोंड देणं कठीण, तोंडाला फेस येईल’; पाटलांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर