राज्यात नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीला मे महिन्याच्या कडक उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. घामाच्या धारा आणि उकाड्यानं नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानानं चाळीशी गाठली आहे. आताची ही परिस्थिती आहे, अजून तर मे महिना जाणं बाकी आहे. त्यामुळे येत्या काळात हिट वेव येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अकोल्यात 42.1 तर परभणी जिल्ह्यात 41.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूर आणि गोंदियाचा क्रमांक त्याखालोख्ला आहे. नागपुरात 40.2 अंश सेल्सियस तर गोंदियामध्ये 40 अंशावर तापमान पोहोचलं आहे. चंद्रपुरात 42 तर ब्रह्मपुरी इथे 41.3 अंश सेल्सियसवर तापमान पोहोचलं आहे
अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ इथे यलो अलर्ट जारी कऱण्यात आला असून या आठवड्यात या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तापमान राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. अमरावतीमध्ये देखील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. एकीकडे वाढणारं कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे वाढणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Comments
Loading…