in

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट

महाराष्ट्रातील काही भागात येणाऱ्या काही तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं होतं. त्यातच शेतकऱ्यांच्या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणात येणाऱ्या गुरूवारपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस जोर धरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव झाला. त्यामध्ये गहू, कांदा इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जागतिक पाणी दिनानिमित्त ‘जलशक्ती’ अभियानाची घोषणा

जनता कर्फ्यूला आज 1 वर्ष पूर्ण